दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलय. ती सध्या बॉलिवूडमधील सर्वांत आघाडीची अभिनेत्री आहे. दरम्यान तिचं सर्व रेकॉर्ड पाहता दीपिकाचं मानधन सुद्धा जास्त असतं. अशातच काही महिन्यांपूर्वी दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता ती पुन्हा कामावर परतली आहे. संदीप रेड्डी वांगाच्या स्पिरिट सिनेमामध्ये ती दिसणार होती. पंरतु 8 तासांच्या शिप्टची अट आणि जास्त पैशाच्या मागणीमुळे तिला चित्रपटातून हकालण्यात आलं. दरम्यान यावरून संदीप रेड्डी वांगा आणि दीपिका यांच्यात बराच वाद होतोय. आता या वादात अजय देवगणने उडी घेतली आहे.