बॉलीवुडमधील सिंघम म्हणून चाहत्याच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या अजय देवगनच्या करियरची सुरवात 1991मध्ये झाली होती. 'फूल और कांटे' हा अजय देवगनचा पहिला चित्रपट होता. आतापर्यंत अजय देवगनने 90 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं आहे. बाजीराव सिंघमला तर चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. 2024मधील सिंघम अगेन चित्रपटाने सुद्धा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. यावर्षी देखील अजय देवगनचा अटके अंदाज चाहत्यांना पहायला मिळणार आहे.