
बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंग यांनी अलीकडेच जुन्या आठवणींना उजाळा देताना एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. अभिनेता अजय देवगण आणि त्यांना होळीच्या दिवशी पोलिसांनी अटक केली होती. कारण काय? त्यांच्या गाडीत हत्यारे आढळल्याचा संशय पोलिसांना आला! मात्र, खरी कहाणी वेगळीच होती.