पंढरपूरच्या वारीचा शुभमुहूर्तावर नुकतच एक भक्तिगीत प्रदर्शित करण्यात आलय. 'ओढ तुझ्या पंढरीची' असं या गाण्याचं शिर्षक आहे. माऊली म्युझिक कंपनीनं त्यांचं हे पहिलंच गाणं प्रदर्शित केलं आहे. प्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या आवाजातील हे गाणं आहे. सध्या या गाण्याने पंढरीची वारी दुमदुमून निघाली आहे.