

alka kubal maherchi sadi
esakal
मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड म्हणून ओळखला जाणारा चित्रपट म्हणजे 'माहेरची साडी'. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं. या चित्रपटात अलका कुबल, अजिंक्य देव, रमेश भाटकर, उषा नाडकर्णी, विक्रम गोखले आणि आशालता वाबगावकर असे अनेक दिग्गज कलाकार होते. हा सिनेमा पाहण्यासाठी ट्रक भरून स्त्रिया थिएटरमध्ये यायच्या. स्वतःच्या परिस्थितीसोबत मिळता जुळता असल्याने अनेक स्त्रिया अलका यांच्या भूमिकेत स्वतःला पाहायच्या. त्यामुळेच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. आता जर या सिनेमाचा सिक्वेल बनला तर यात कोणकोणते कलाकार योग्य असतील याबद्दल अजिंक्य देव यांनी त्यांचं मत मांडलं आहे.