

Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal Election Result
esakal
Entertainment News : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने एकहाती विजय मिळवत वर्चस्व कायम राखले आहे. थेट निवडणुकीसाठी झालेल्या १४ जागांपैकी सर्व १४ जागांवर समर्थ पॅनेलचे उमेदवार विजयी झाले, तर विरोधी चित्रकर्मी पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही.