

reshma shinde on affair with akshar kothri
ESAKAL
'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. तिची 'लगोरी' ही मालिका देखील चांगलीच गाजली होती. त्यानंतर ती 'रंग माझा वेगळा' या मालिकेतून घराघरात पोहोचली. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. रेश्मा सोशल मीडियावरही सक्रीय असते. तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. मात्र रेश्माबद्दल काही अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या. आता रेश्माने त्या अफवांवर भाष्य केलं आहे.