
KALJALMAYA LEAD ACTRESS
ESAKAL
छोट्या पडद्यावर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. गेल्या काही महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मालिकेपेक्षा ही मालिका वेगळी आहे. 'काजळमाया' असं या मालिकेचं नाव असून यात अभिनेता अक्षय केळकर मुख्य भूमिकेत आहे. ३०० वर्षानंतर परत आलेली चेटकीण पर्णिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ही भूमिका एक नवीन अभिनेत्री साकारणार आहे. ती स्टार प्रवाहचा नवा चेहरा बनली आहे.