
KAJALMAYA
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांत अनेक नवीन मालिका सुरू झाल्या. त्यात झी मराठीवर दोन तर स्टार प्रवाहवर दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात 'लपंडाव' आणि 'नशीबवान' या मालिका आहेत. या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. मात्र असं असताना काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहने आणखी एका मालिकेची घोषणा केली. ती म्हणजे 'काजळमाया'. अतिशय वेगळ्या प्रकारची कथा आणि गूढ प्रकारात मोडणारी ही मालिका येणार हे समजताच प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या. त्यानंतर या मालिकेत कोण कोण आहे हे जणूं घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता अखेर या मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय.