सध्या सोशल मीडियावर विक्की कौशल याच्या 'छावा' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील विक्कीचा फस्ट लूक रिलीज करण्यात आला. त्यानंतर रश्मिका मंदाना हिचा महाराणी येसुबाईतील लूक रिलीज करण्यात आला. दरम्यान आता अक्षय खन्ना यांचा औरंगजेबातील लूक सर्वांसमोर आला आहे. लूक पाहून अक्षय खन्नाला ओळखणं सुद्धा कठीण जात आहे.