
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याने कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना चकीत केलं. मात्र त्याच्या अभिनयाचं फार कौतुक झालं नाही. आता 'छावा' चित्रपटात त्याने साकारलेली औरंगजेबाची भूमिका चांगलीच गाजली. प्रेक्षकांनी त्याचं प्रचंड कौतुक केलं. त्याने आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. अक्षयचे वडील विनोद खन्ना यांनीही बॉलिवूडचा एक काळ गाजवलंय. मात्र संसाराला कंटाळून ते चक्क ओशोंच्या आश्रमात पोहोचले होते. तिथे ते नेमकं काय काम करायचे याचा खुलासा अक्षयने एका मुलाखतीत केला होता.