Akshay Kumar Vote: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Lok Sabha 2024 Elections: मतदान केल्यानंतर अक्षय पत्रकारांशी संवाद साधला आणि लोकांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे.
akshay kumar vote
akshay kumar voteesakal

Lok Sabha 2024 Elections: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024 elections) पाचव्या टप्प्याचं मतदान सध्या सुरु आहेत. मुंबईतील मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. अशातच आता अनेक सेलिब्रिटी देखील मतदान करण्यासाठी जात आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं (Akshay Kumar) पहिल्यांदाच मतदान केलं आहे. गेल्या वर्षी अक्षयला भारताचं नागरिकत्व मिळालं. त्यानंतर अक्षयनं पहिल्यांदाच मतदान केलं. अशातच मतदान केल्यानंतर अक्षय पत्रकारांशी संवाद साधला आणि लोकांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे.

काय म्हणाला अक्षय?

अक्षय म्हणाला, "माझी इच्छा आहे की, माझा भारत देश हा विकसित आणि सशक्त व्हावा. हे लक्षात घेऊन मी मतदान केले. लोकांना जो व्यक्ती योग्य वाटेल त्यालाच त्यांनी मतदान करावे. मला वाटते मुंबईत मतदान चांगले होईल." भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मत देण्याबद्दल विचारले असता, अक्षय म्हणाला, “मला खूप छान वाटत आहे!”

ऑगस्ट 2023 मध्ये अक्षयने त्याच्या सरकारी कागदपत्रांचा एक फोटो शेअर केला होता, हा फोटो शेअर करुन अक्षयनं चाहत्यांना सांगितलं की, त्याला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. "हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही भारतीय. जय हिंद", असं कॅप्शन अक्षयनं फोटोला दिलं होतं.

अक्षय कुमारने 1990 मध्ये कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला. त्यानंतर 2019 मध्ये, अक्षयने कॅनडाचे नागरिकत्व सोडले, परंतु कोविड-19 महामारीमुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्यास बराच वेळ लागला. त्यानंतर गेल्यावर्षी अक्षयला भारताचं नागरिकत्व मिळालं.

akshay kumar vote
Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

अक्षयचे आगामी चित्रपट

अक्षय कुमारचे जॉली एलएलबी, सिंघम अगेन, वेलकम टू द जंगल हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामधील सिंघम अगेन हा चित्रपट  15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  अक्षयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com