
गेल्या काही दिवसांपासून 'हेरा फेरी ३'बद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' मध्ये काम करायला दिलेला नकार. परेश यांनी नकार देताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र त्यांनी आपण या चित्रपटाचा भाग नसणार आहोत हे स्पष्ट केलं. सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं की त्यांना चित्रपटाची कथा ना आवडल्याने आणि क्रिएटिव्ह डिफरन्स असल्याने त्यांनी हा चित्रपट सोडला होता. मात्र आता एक वेगळीच गोष्ट समोर येतेय. त्यातही सगळ्यांना चकीत करणारी गोष्ट म्हणजे अक्षय कुमारने परेश रावल यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ज्यात त्याने प्रोफेशनल पद्धतीने न वागल्यामुळे परेश रावल यांच्यावर २५ कोटींचा खटला दाखल केला आहे.