Akshay Kumar: "मी असा ब्रेकअप्समधून सावरलो'',अक्षयने केला खुलासा

नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या रिलेशनबाबत आणि ब्रेकअपबाबत खुलासा केला |In a recent interview, Akshay Kumar opened up about his relationship and breakup

Akshay Kumar
Akshay Kumar sakal

बॉलिवूडमधील सगळ्यांचं लाडकं कपल म्हणजे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना. कायमच सोशल मीडियावर हे दोघे एकमेकांसाठी पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या लग्नाला नुकतीच २३ वर्ष पूर्ण झाली. ट्विंकलशी लग्न करण्यापूर्वी अक्षय काही रिलेशनशिप मध्ये होता. नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या रिलेशनबाबत आणि ब्रेकअपबाबत खुलासा केला. (akshay kumar reation on breakup)

रणवीर अलाहबादीयाच्या युट्युब चॅनेलसाठी नुकतीच मुलाखत दिली. यावेळी रणवीरने त्याला ब्रेकपमधून बाहेर येण्यासाठी टिप्स विचारल्या त्यावर अक्षयने उत्तर दिलं कि,"माझे दोन-तीन ब्रेक झाले, त्यावेळी मी खूप जास्त व्यायाम करायला लागायचो. (how many bearkups aksahy kumar had)


Akshay Kumar
Akshay Kumar: "त्यानं नखामध्ये ब्लेड लपवलं होतं अन्..."; खिलाडी अक्षनं सांगितला चाहत्यासोबतचा धक्कादायक अनुभव

मी माझा सगळा राग तिथे काढायचो कारण माझ्या मनात खूप राग होता. ब्रेकअपनंतर तुम्हाला काय करायचंय हे ठरवावं लागेल. मी खूप व्यायाम करण्यावर भर दिला. मी खूप खायचो आणि व्यायाम करायचो. मला वाटतं कदाचित मार्शल आर्टिस्टकडे ब्रेकअपला सामोरं जाण्याचा हा एक रस्ता आहे. याच माध्यमातून आपण हार्टब्रेक काय असतो ते समजू शकतो, असा माझा विश्वास आहे"

ट्विंकलशी लग्न करण्यापूर्वी अक्षय रविना टंडन आणि पूजा बत्रा यांच्यासोबतही रिलेशनमध्ये होता. पण यांच्याशी त्याच नातं फार काळ टिकलं नाही. रविनाशी त्याचा साखरपुडाही झाला होता पण पुढे या जोडीचा ब्रेकअप झाला. २००१ मध्ये अक्षय आणि ट्विंकलने लग्न केलं. त्यांना आरव आणि नितारा ही दोन मुलं आहेत.(twinkal khanna husband)


Akshay Kumar
Akshay Kumar: 'अरे बाबा तो टॉम क्रुझ आहे, त्याच्या एका स्टंटमध्ये आपल्या...' काय बोलून गेला अक्षय कुमार?

अक्षयचा आता बडे मियाँ छोटे मियाँ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. १० एप्रिल २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार असून अभिनेता टायगर श्रॉफची सुद्धा यात महत्त्वाची भूमिका आहे. यासोबतच मानुषी छिल्लर आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि अनेकजण हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (movie bade mia chote mia )

पहा व्हिडीओ: https://www.youtube.com/watch?v=IGzLHNPO4QI&pp=ygUcYmFkZSBtaXlhIGNob3RlIG1peWEgdHJhaWxlcg%3D%3D

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com