AKSHAY KUMAR VIRAL VIDEO
esakal
AKSHAY KUMAR TAKES MIC FROM AMRUTA FADNAVIS: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या चर्चेत आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल पीस ऑनर्स २०२६ या कार्यक्रमातील त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी अक्षयने पायाला आग लावत थरारक परफॉर्मन्स केला. परंतु या सगळ्यात एका वेगळ्याच व्हिडिओनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हातातून अचानक माईक घेतल्याचं पाहायला मिळत आहे.