
akshay kumar
esakal
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अक्षय कुमार बॉलिवूडचा खिलाडी आहे. तो त्याच्या करिअरबद्दल जितका सजग आहे तितकाच तो त्याच्या कुटुंबाची देखील काळजी घेतो. तो त्याच्या कुटुंबाला जपताना दिसतो. विशेषतः त्याच्या मुलांबद्दल अक्षय खूप प्रोटेक्टिव्ह आहे. सध्याच्या जगाच्या ऑनलाइन फ्रॉड आणि अब्यूजमुळे पालकांना जास्त सतर्क राहावं लागतं. दर दहापैकी ८ महिलांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे छळ आणि विनयभंग सहन करावा लागतो. असाच एक प्रकार अक्षय कुमारच्या मुलीसोबतही घडला आहे.एका कार्यक्रमात अक्षयने स्वतः या घटनेबद्दल सांगितलंय.