स्काय फोर्स चित्रपटात अक्षय कुमारसोबत वीर पहाडिया मुख्य भुमिकेत पहायला मिळणार आहे. वीर पहाडिया या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात वीर पहाडिया यांची सारा अली खानसोबतची केमेंट्री पहायला मिळणार आहे. सारा अली खान या चित्रपटात वीर पहाडिया यांच्या पत्नीची भूमिका निभावणार आहे. एकेकाळी सारा अली खान आणि वीर पहाडिया एकमेकांना डेट करत होते. परंतु आता ते एक चांगले मित्र म्हणून राहत आहेत.