
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधर हिने पाठकबाई बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अक्षयाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. तिच्या निखळ हास्यावर चाहते फिदा आहेत. त्यात राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया यांची जोडी प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. त्यांनी २ डिसेंबर २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. सध्या अक्षया 'लक्ष्मीनिवास' या मालिकेत काम करतेय. या मालिकेत ती भावनाच्या भूमिकेत दिसतेय. त्यातही सध्या भावनांचं लग्न सुरू आहे. त्यानिमित्ताने अक्षयाने तिच्या लग्नातला एक किस्सा सांगितलाय.