
alia bhatt
esakal
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट हिने करिअरच्या शिखरावर असताना लग्न केलं. जेव्हा मुलं झाल्यानंतर अभिनेत्रीचं करिअर थांबतं असं म्हटलं जातं तिथे तिने लग्नानंतर वर्षभरातच मुलगी राहाला जन्म दिला. तिच्या या दोन्ही धाडसी निर्णयाचं खूप कौतुक झालं. मात्र राहाच्या जन्मानंतर आलिया लगेच बारीक झाली. तिचं वजन झपाट्याने कमी झालं. त्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलेलं. आता आलियाने नुकतीच अभिनेत्री काजोल आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये बोलताना तिने ती आणि रणबीर किती वाजता झोपतात इथपासून ते तिचं वजन कसं कमी झालं याबद्दल भाष्य केलंय.