
alia bhatt
esakal
अभिनेत्री आलिया भट्टने एका पुरस्कारामध्ये पुन्हा एकदा आपली छाप उमटवली आहे. तिच्या ‘जिगरा’साठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला असून, हा तिच्या कारकिर्दीतील सहावा पुरस्कार ठरला आहे. यापूर्वी तिला ‘उडता पंजाब’, ‘राझी’, ‘गली बॉय’, ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटांसाठीही हा सन्मान मिळाला होता, परंतु यंदा तिच्या यशानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.