
डायरेक्टर पायल कपाडिया यांच्या ‘ऑल वी इमेजिन इज लाइट’ हा चित्रपट रिलीज होताच चाहत्यांनी या चित्रपटाला मोठी पसंती दाखवली. परदेशातही या चित्रपटाला भरभरुन प्रेम मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाला गोल्डन ग्लोब अवॉर्ड्ससाठी नामाकंन मिळाले होते. त्यानंतर आता या चित्रपटाने यशाचं आणखी एक शिखर गाठले आहे. ‘ऑल वी इमॅजिन इज लाइट’ चित्रपटाची आता बाफ्टा अवॉर्ड्ससाठी निवड झाली आहे.