Chiranjeevi: पद्मविभूषण पुरस्काराने चिरंजीवी सन्मानित; अल्लू अर्जुननं खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा, म्हणाला...

Chiranjeevi:अल्लू अर्जुननं (Allu Arjun) चिरंजीवी यांच्यासाठी खास पोस्ट शेअर करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Chiranjeevi
ChiranjeeviSAKAL

Chiranjeevi: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी (Chiranjeevi) यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अशातच आता चिरंजीवी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) चिरंजीवी यांच्यासाठी खास पोस्ट शेअर करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं . या खास प्रसंगी मेगास्टारची पत्नी सुलेखा, मुलगा राम चरण, मुलगी आणि सून उपासना कामिनेनी इत्यादी जण उपस्थित होते.

अल्लू अर्जुनची पोस्ट

'पुष्पा 2' स्टार अल्लू अर्जुननेही त्याचे काका चिरंजीवी यांना पद्मविभूषण मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. अल्लू अर्जुननं त्याच्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये आणि ट्वीटमध्ये लिहिलं, "पद्मविभूषण हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल चिरंजीवी यांचे मनःपूर्वक अभिनंदन, आपल्या सर्वांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे."

Chiranjeevi
Chiranjeevi Poster On Times Square : चिरंजीवी 'टाईम्स स्क्वेअर'वर झळकले! 'पद्मविभुषण' जाहीर होताच फॅन्सकडून सेलिब्रेशन

चिरंजीवी यांचा आगामी चित्रपट

चिरंजीवी हे 'विश्वंभरा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मल्लिदी वसिष्ठ दिग्दर्शित हा चित्रपट 2025 च्या संक्रांतीमध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. चिरंजीवीसोबत त्रिशा, मीनाक्षी चौधरी आणि सुरभी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत आणि सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. चिरंजीवी यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com