Entertainment News: "क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

Amar Upadhyay: शेअरमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिश दाखवून अमरची फसवणूक करण्यात आली.
 "क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल
Amar Upadhyaysakal

Amar Upadhyay: प्रसिद्ध अभिनेता अमर उपाध्याय (Amar Upadhyay) हा विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. सध्या अमर हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अमरची फसवणूक झाली आहे. शेअरमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिश दाखवून अमरची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं.

अमर उपाध्यायची सव्वाकोटींची फसवणूक

"क्योंकि सास भी कभी बहू थी" या मालिकेत स्मृती इराणी यांच्यासोबत काम करणारा अभिनेता अमर उपाध्याय याची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअरमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिश दाखवत एका जोडप्याने सुमारे सव्वाकोटींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी सव्वाकोटींचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कुणाल शहा आणि हिनल मेहता अशी या आरोपी पती-पत्नींची नावे असून ते दोघेही डायलाईट्स इन्वेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. या दोघांवर शेअरमध्ये चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून फसवणुक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

या प्रकरणाची माहिती देताना मुंबईच्या वर्सोवा पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमर उपाध्यायनं सुरुवातीला 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर त्या जोडप्यानं सांगितले की जर त्याने अधिक गुंतवणूक केली तर तो 2026 पर्यंत 5 कोटी ते 15 कोटी रुपये कमवू शकतो.

 "क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल
Allu Arjun: आमदार मित्राच्या घरी गेलेल्या अल्लू अर्जुनवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

जाणून घ्या अमर उपाध्यायबद्दल

अमरनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. कलश, कसौटी जिंदगी काय, कुसुम आणि मोल्की या मालिकेतील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली."क्यू की सास भी कभी बहू थी' या मालिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com