
स्टार प्रवाहवर नव्याने सुरू झालेला कार्यक्रम 'शिट्टी वाजली रे' सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. फार कमी कालावधीत या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. या कार्यक्रमात अनेक कलाकार एकत्र येऊन जेवण बनवतात. आणि परीक्षक त्याला जज करतात. या कार्यक्रमात गौतमी पाटील, धनंजय पोवार, घन:श्याम दरवडे, निक्की तांबोळी, विनायक माळी हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. सोबतच नवनवीन कलाकार या कार्यक्रमात एंट्री घेत असतात.अशातच आता वाहिनीने शेअर केलेला प्रोमो पाहून नेटकरी अमेय वाघवर चांगलेच भडकले आहेत.