Amhi Jarange Trailer: "संघर्षा बिगर काही खरं नसतं"; “आम्ही जरांगे”चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Makarand Deshpande Film: “आम्ही जरांगे” (Amhi Jarange) हा सिनेमा लवकरच म्हणजेच 14 जुन 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
"संघर्षा बिगर काही खरं नसतं"; “आम्ही जरांगे”चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
Amhi Jarangesakal

Amhi Jarange: गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे” (Amhi Jarange) हा सिनेमा लवकरच म्हणजेच 14 जुन 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झालाय. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

“आम्ही जरांगे” चित्रपटाची स्टार कास्ट

“आम्ही जरांगे” या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारताय. तसेच अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे पाटील ह्यांची भूमिका साकारली आहे. इतकच नव्हे तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारताय. सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही महत्वाची भूमिका साकारत आहेत.

पाहा ट्रेलर:

नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित या चित्रपटाचे सह निर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, डॉ. दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत. या चित्रपटाची कथा - पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे.

"संघर्षा बिगर काही खरं नसतं"; “आम्ही जरांगे”चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रुपात रूपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीचं असणार आहे.

'आम्ही जरांगे'' 14 जूनला होणार रिलीज

खऱ्या आयुष्यात मराठ्यांचा साथ मिळवल्या नंतर आता आरक्षणाच्या चर्चेत असलेल्या मनोज जरांगे पाटील ह्यांना मोठ्या पडद्यावर सुद्धा प्रेक्षकांचा तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल ह्यात काही शंका नाही. ''आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा'' 14 जूनला आपल्या जवळच्या सिनेमागृहात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com