
Entertainment News : वेधक कथानक आणि अनपेक्षित कलाटण्या यामुळे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘आमी डाकिनी’ मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोलकाताच्या सुंदर पार्श्वभूमीवरील कथानक असलेली ही मालिका या वाहिनीसाठी एक आकर्षक, आगळेवेगळे कथानक घेऊन आली आहे. पूर्वी ‘आहट’ मालिकेत अनुभवलेला थरकाप प्रेक्षक आता पुन्हा या मालिकेतून अनुभवू शकतील. या मालिकेत हितेश भारद्वाज अयानच्या भूमिकेत आहे, तर शीन दास आणि राची शर्मा अनुक्रमे डाकिनी आणि मीरा यांच्या भूमिका करत आहेत.