
Bollywood Entertainment News : बॉलिवूड दिवंगत अभिनेता इरफान खानचा लेक बाबिल खान गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकाराबद्दल खळबळजनक विधाने केली होती. घराणेशाही, गटबाजी यावर बोलताना तो ढसाढसा रडला. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. पण काही वेळातच त्याचं इंस्टाग्राम डिलीट झालं. त्याच्या टीमने स्पष्टीकरण देतं व्हिडीओ चुकीचा असल्याचं निवेदन जाहीर केलं.