Ek Din Teaser
esakal
आमिर खान प्रॉडक्शनचा आगामी चित्रपट 'एक दिन'चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत एका नव्या जोडीकडे लक्ष वेधले गेले आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री साई पल्लवी यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे आणि ते दोघे एकत्र येत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.