प्यार मोहोब्बत झूट.. शूट... गाण्यावर अमित भानुशालीच्या पत्नी अन् मुलाचा जबरदस्त रील; नेटकरी पाहतच राहिले, म्हणतात-

Amit Bhanushali Wife And Son Viral Reel | Family Dance Video Wins Attention On Social Media: 'ठरलं तर मग' फेम लोकप्रिय मराठी अभिनेता अमित भानुशाली याच्या पत्नी आणि मुलाच्या रीलने नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठं स्माइल आणलंय. तुम्ही पाहिलंत का?
amit bhanushali wife reel

amit bhanushali wife reel

esakal

Updated on: 

'ठरलं तर मग' मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता अमित भानुशाली म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका अर्जुन सगळ्यांचा आवडता आहे. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या अर्जुन सोशल मीडियावर चर्चेत आहे. कलाकार अनेकदा चाहत्यांशी जोडलेले राहण्यासाठी इंस्टाग्रामवर अनेक रील शेअर करताना दिसतात. स्वतःच्या आयुष्यातील काही खास घटना आणि फोटो शेअर करताना दिसतात. अमितदेखील त्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. मात्र यावेळेस अमित त्याच्या पत्नी आणि मुलामुळे चर्चेत आहे. अमितच्या पत्नीने मुलासोबतचा एक सुंदर असा रील शेअर केलाय जो पाहून नेटकरी खुश झालेत.

Loading content, please wait...