
'ठरलं तर मग' ही मालिका गेली कित्येक महिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालंय. 'स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली मुख्य भूमिकेत दिसतायत. ते मालिकेत सायली आणि अर्जुनच्या भूमिकेत दिसतायत. त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यामुळेच त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. अशातच आता अमितच्या पत्नीने त्यांच्या मुलाचा एक गोड व्हिडिओ शेअर केलाय.