

shivani naik TROLL
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी नाईक 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतून घराघरात पोहोचली. आताही 'अप्पी आमची कलेक्टर' नाव घेतलं की डोळ्यासमोर शिवानी उभी राहते. तिने मालिकेत आयपीएस ‘अपर्णा सुरेश माने’ ही भूमिका साकारली होती. या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. काही दिवसांपूर्वीच शिवानीचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला अनेक कलाकार देखील उपस्थित होते. ती अभिनेता अमित रेखी याच्यासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतीच या जोडीने इट्स मज्जाला मुलाखत दिली. यात त्यांनी शिवानीला झालेल्या ट्रोलिंगबद्दल मोकळेपणाने भाष्य केलंय.