
Amitabh Bachchan Ayodhya Land Purchase : बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. अमिताभ बच्चन यांनी अयोध्येतील रामलल्लाच्या जन्मस्थळापासून १० किलोमीटर अंतरावर ५४,४५४ चौरस फूट जमीन खरेदी केली आहे, ज्यावर त्यांचे वडील आणि प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन यांचे स्मारक बांधण्याची योजना आहे. यातून त्यांच्या वडिलांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली जाईल तसेच या परिसराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल.