
amitabh bachchan first love
esakal
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आज ११ ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. ते ८३ वर्षाचे झालेत. छोट्या मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत कोट्यवधी लोक त्यांचे चाहते आहेत. इतकं वय झालेलं असूनही त्यांचा काम करण्याचा उत्साह मुळीच कमी झालेला नाही. आजही ते अनेक चित्रपटात काम करतात. स्टंट सीन करतात,डान्स करतात. 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम आजही ते तितक्याच उत्साहाने होस्ट करतायत. त्यांनी जया यांच्यासोबत लग्न केलं असलं तरी त्यांचं नाव रेखा यांच्यासोबतही जोडलं गेलं. आजही त्यांच्या प्रेमाच्या चर्चा होतात. मात्र असं असलं तरी अमिताभ यांचं पहिलं प्रेम कुणीतरी दुसरीच व्यक्ती होती.