प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका; कुठे कधी? अमोल कोल्हेंची मोठी घोषणा

MI SAVITRIBAI PHULE SERIAL TELECAST: 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र आता ती ही मालिका ज्या आठवड्यात बंद होतेय त्याच आठवड्यात दुसरीकडे प्रक्षेपित होणार आहे.
MI SAVITRIBAI JOTIRAO PHULE SERIAL

MI SAVITRIBAI JOTIRAO PHULE SERIAL

ESAKAL

Updated on

गेले कित्येक दिवस सोशल मीडियावर एक मुद्दा गाजतोय तो म्हणजे स्टार प्रवाहच्या 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' या मालिकेचा. वाहिनीने टीआरपीचं कारण देत मालिका बंद करणार असल्याचं सांगितलं. मात्र या मालिकेतील मुख्य अभिनेते अमोल कोल्हे यांनी ही मालिका बंद होणार नसल्याचं सांगितलंय. ज्या आठवड्यात ही मालिका बंद होणार आहे. त्याच आठवड्यात पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुठे, कधी, कशी याबद्दल त्यांनी सविस्तर माहीती दिलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com