
Marathi Entertainment News : छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आलेली पहिली मराठी मालिका म्हणजे स्वराज्यरक्षक संभाजी. छत्रपती शंभूराजेंचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पहिलं श्रेय या मालिकेला जातं. पण छावा सिनेमा रिलीज झाल्यानंतर या मालिकेवर आणि मालिकेत छत्रपती संभाजी राजांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंवर टीका झाली. याबद्दल अमोल यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत खुलासा केला.