amrita singh raveena tandon
amrita singh raveena tandon esakal

तिच्यासारख्या लोकांसोबत... जेव्हा अमृता सिंगने रवीना टंडनला दिलेली शिवी; सैफ अली खान ठरलेला कारण

Amrita Singh Fight With Raveena Tandon: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग हिने एका मुलाखतीत थेट रवीना टंडनला शिवी घातली होती. नेमकं काय घडलं होतं?
Published on

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन तिच्या करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. तिचं अक्षय कुमारसोबतचं अफेअर आणि साखरपुडा खूप चर्चेत होते. 1990 मध्ये दोघांनी साखरपुडा केला. ते लग्न करणार होते परंतु, नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. मात्र, रवीनाचं नाव सैफ अली खानसोबतही जोडलं गेलेलं हे फार कमी लोकांना माहीत असेल. तेव्हा सैफचं लग्नही झालं होतं. त्याचं लग्न अमृता सिंगशी झालं होतं. पण जेव्हा रवीना आणि सैफच्या अफेअरची बातमी अमृताच्या कानावर पडली तेव्हा ती चांगलीच भडकली. रवीना टंडनच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुमच्यासाठी तो किस्सा आणला आहे जेव्हा अमृताने रवीनाला शिवी घातली होती.

रवीना खूप उद्धट आणि चिडखोर

रवीनाने सैफ अली खानसोबत 'इम्तिहान', 'मैं खिलाडी तू अनारी', 'कीमत', 'परंपरा' आणि 'पहला नशा' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, एकत्र काम करताना दोघांची नावंही एकमेकांशी जोडली जाऊ लागली. परंतु, जेव्हा ही गोष्ट अमृताला समजली तेव्हा ती प्रचंड भडकली. तिने ९० च्या दशकात 'सिनेब्लिट्ज' या मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत थेट रवीनाला शिव्या दिल्या होत्या. अमृता म्हणाली होती की, 'रवीना खूप उद्धट आणि चिडखोर बीच आहे. तिची आणि माझी कधीच मैत्री झाली नाही. माझा नवरा सैफ आणि रवीनाचं अफेअर... तू खरंच हा प्रश्न विचारताय? मी म्हणेन की सैफ जास्त हुशार आणि बुद्धीवान आहे. मला वाटतं या-सैफची निवड जास्त चांगली आहे. तो रवीना टंडनला निवडणार नाही. तिच्यासारख्या मुलींसोबत मी बोलतही नाही. '

अमृता पुढे म्हणाली, 'जेव्हा आम्ही नाशिकमध्ये एकत्र होतो तेव्हा रवीना माझ्याशी अजिबात बोलली नाही. जर कोणी मला शुभेच्छा देऊ इच्छित नसेल किंवा माझ्याशी बोलू इच्छित नसेल तर ही त्याची समस्या आहे. मी माझ्या लिमिट बाहेर जाऊन रवीनासारख्या लोकांशी बोलेन अशी अपेक्षा करू नका. रवीना आणि मला एकाच श्रेणीत ठेवले तर मला खूप वाईट वाटेल. तिची माझी बरोबरी होऊच शकत नाही.' तिची ही मुलाखत प्रचंड गाजली होती.

amrita singh raveena tandon
'कभी खुशी कभी गम'च्या हेलिकॉप्टर सीनवरून नाराज होता किंग खान; कारण वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com