गरब्यासाठी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं भेटीला ! 'मारी महिसागर'वर मिसेस मुख्यमंत्र्यांनी केल्या भन्नाट स्टेप्स

AMRUTAV FADNAVIS NEW SONG FOR NAVRATRI: अमृता फडणवीस यांनी नवरात्रीनिमित्त चाहत्यांना भेट दिली असून त्यांचं नवीन गाणं मारी महिसागर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.
AMRUTA FADNVIS NEW SONG  GOR GARBA

AMRUTA FADNVIS NEW SONG GOR GARBA

ESAKAL

Updated on: 

गणपती गेल्यानंतर सगळेच आता नवरात्रीच्या तयारीला लागलेत. देवींच्या आगमनासाठी सारा संसार सज्ज झालाय. संपूर्ण देशभरात हा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. अनेक ठिकाणी दांडिया आणि गरबाचं आयोजन केलं जातं. नवरात्रीनिमित्त अनेक नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मात्र यावेळेस प्रेक्षकांसाठी खास सरप्राइज आहे. मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी नवरात्रीनिमित्त नवीन गाणं प्रदर्शित केलंय. 'मारी महिसागर' असं या गाण्याचं नाव असून सध्या हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com