
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. तिने 'चंद्रमुखी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. अमृता तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिने २०१५ साली हिंदीआणि पंजाबी अभिनेता हिमांशू याच्यासोबत लग्न केलं. त्यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केलं होतं. त्यांच्या लग्नाला आता १० वर्ष झालीयेत. ते दोघे एकमेकांपासून दूर राहत असले स्त्री एकमेकांबद्दल कायम बोलताना दिसतात. आता नुकतीच अमृताने हिमांशूच्या 'केसरी वीर' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.