

amruta khanvilkar
esakal
गेल्या दोन वर्षात अनेक मराठी कलाकारांनी अभिनयसोबतच इतर गोष्टीकडे लक्ष वळवत दुसरा पर्याय म्हणून स्वतःचा बिझनेस सुरू केला. कुणी स्वतःचं हॉटेल काढलं तर कुणी दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला. कुणी कपड्यांचं दुकान सुरू केलं तर कुणी नेल आर्टचा बिझनेस सुरू केला. आता या कलाकारांच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलंय. आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांना वेड लावणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील आता बिझनेसवूमन झालीये. तिने कसला व्यवसाय सुरू केलाय ठाऊक आहे का?