आज महाराष्ट्राच्या मनावर करतेय राज पण कॉलेजमध्ये कुणीही देत नव्हतं भाव; आता म्हणते- आता त्यांना पश्चाताप होत असेल की..

Marathi Actress Reveals Nobody Proposed To Her During Her College Days: आज जिच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र वेडा आहे, तिला कॉलेजमध्ये कोणीच भाव देत नव्हतं. अभिनेत्रीला आजही त्याची खंत आहे.
amruta khanvilkar

amruta khanvilkar

esakal

Updated on: 

आज जिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची चर्चा महाराष्ट्राच्या घराघरांत होते, जिच्या एका झलकसाठी चाहते उत्सुक असतात, त्या अभिनेत्रीला कॉलेजमध्ये मात्र फारसं कोणी विचारत नव्हतं. आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात असा एक काळ होता, जेव्हा कॉलेजमध्ये तिला कोणी प्रपोज करणं तर दूरच, साधा भावही देत नव्हतं. विशेष म्हणजे, अनेक वर्षांनंतरही तो अनुभव तिच्या लक्षात आहे आणि त्याबद्दलची खंत तिने एका कार्यक्रमात व्यक्त केली. कोण आहे ही अभिनेत्री? ती म्हणजे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय चेहरा अमृता खानविलकर.

Loading content, please wait...