
मराठी कलाकार असो किंवा हिंदी प्रत्येकजण आपल्या डाएटची विशेष काळजी घेताना दिसतात. आपली फिगर मेंटेन करायला तेलकट तुपकट असं काहीही खाण्याला त्यांचं विरोध असतो. घरचं बनवलेलं अन्न खाण्यावर त्यांचा विशेष भर असतो. सोबतच त्यांच्या जेवणात ग्लूटेन फ्री, शुगर फ्री अशा बऱ्याच गोष्टी असतात. मात्र प्रत्येकाची एक आवडती गोष्ट असते. तो त्यांचा वीक पॉईंट असतो. त्या गोष्टींशिवाय ते जगू शकत नाहीत. प्रत्येकाला कसलं ना कसलं व्यसन असतं. असंच एक व्यसन अभिनेत्री अमृता खानविलकर हिला आहे. तिने स्वतः तिच्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं.