

amruta khanvilkar criptic post in divorce rumours
esakal
आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांना भुरळ पडणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण तिचा एखादा चित्रपट नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेलं वादळ आहे. अमृताच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. अमृता आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याचं समजतंय. गेली दीड वर्ष ते दोघे वेगळे राहत असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तीने दिलीये. त्यामुळे हे दोघे आता घटस्फोट घेणार का असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. मात्र अशातच अभिनेत्रीच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.