
Marathi Entertainment News : साने गुरुजींच्या हृदयस्पर्शी आत्मकथनावर आधारित श्यामची आई हा चित्रपट २०२३ साली नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ओम भूतकर, गौरी देशपांडे, शार्व गाडगीळ आणि संदीप पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके यांनी केलं, तर निर्मितीची जबाबदारी अमृता राव यांनी सांभाळली. नुकताच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने निर्माती अमृता राव यांच्याशी केलेली ही खास बातचीत...