मराठी अभिनेत्री अमृता सुभाष हिचा जारण चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील अमृता सुभाष हिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे. चित्रपटात अनिता दाते आणि अमृता सुभाष या दोघींच्याही अभिनयाचं तोंडभरून कौतूक करण्यात आलय. इतकं सगळं होत असताना अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे चाहत्यांनी तिच्याबाबत काळजी व्यक्त केलीय.