'आईनेच माझ्या सासूची भूमिका साकारली' गली बॉय सिनेमात माय लेकी झालेल्या सासू-सुना, अमृता सुभाषने खुलासा केला तेव्हा...

Amruta Subhash REVEALS Jyoti Subhash PLAYED HER MOTHER IN LAW IN Gully Boy: अमृता सुभाष हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गली बॉय सिनेमाशी संबंधित एक मजेशीर किस्सा शेअर केला. या सिनेमात तिच्या सासूची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष या प्रत्यक्षात तिच्याच आई आहेत, हे अनेकांना माहिती नसल्याचं तिने सांगितलं.
Amruta Subhash

Amruta Subhash

esakal

Updated on

Gully Boy ACTRESS Amruta Subhash SHARES FUNNY STORY ABOUT HER REAL MOTHER: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता सुभाष हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. तिने बॉलिवूडमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. अमृता सुभाष ही ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांची कन्या आहे. त्यांनी आजवर अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com