
मराठी मालिका असो, चित्रपट असो किंवा नाटक प्रत्येक क्षेत्रात अभिनेत्री अमृता सुभाष हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. मराठीसोबतच तिने हिंदी चित्रपटांमध्येही उत्कृष्ट काम केलंय. रणवीर सिंग ते कार्तिक आर्यन अनेक बड्या कलाकारांसोबत तिने काम केलंय. सध्या ओटीटी गाजवतेय. तिचा 'जारण' हा चित्रपट नुकताच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालाय. त्यानिमित्ताने तिने अनेक मुलाखती दिल्या आहेत. यात तिने आपण गेली १० वर्ष मानसोपचार तज्ञाकडे जात असल्याचं सांगितलंय.