Anant-Radhika pre-wedding : रिहानानंतर आता कॅटी पेरीचा जलवा; अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये केला धमाकेदार परफॉर्मन्स, किती घेतलं मानधन?

Anant Ambani-Radhika Merchant pre-wedding Bash: अनंत आणि राधिका यांच्या क्रूझवरील प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी परफॉर्म केलं.
रिहानानंतर आता कॅटी पेरीचा जलवा; अनंत-राधिका यांच्या क्रूझवरील प्री-वेडिंगमध्ये केला धमाकेदार परफॉर्मन्स, किती घेतलं मानधन?
Anant Ambani And Radhika Merchantsakal

Anant Ambani And Radhika Merchant: गुजरातमधील जामनगर येथे अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचे पहिले प्री-वेडिंग फंक्शन पार पडले. या प्री-वेडिंग फंक्शनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पहिल्या प्री-वेडिंग फंक्शनप्रमाणेच आता अनंत आणि राधिका यांचे दुसरं प्री-वेडिंग देखील ग्रँड पद्धतीनं होणार आहे. अनंत आणि राधिका यांचे दुसरे प्री-वेडिंग फंक्शन एका क्रूझमध्ये होत आहे. या क्रूझवरील प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी परफॉर्म केलं. पॉप सिंगर कॅटी पेरीनं (Katy Perry) देखील या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म केलं आहे. तिच्या या परफॉर्मन्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

कॅटी पेरीने किती घेतलं मानधन?

अनंत आणि राधिका यांच्या पहिल्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये पॉप सिंगर रिहानानं परफॉर्म केलं. आता अनंत आणि राधिका यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये कॅटी पेरीने परफॉर्म केलं आहे. रिपोर्टनुसार, क्रूझवर कॅटी पेरीचा परफॉर्मन्स करत असताना आकाशामध्ये फटाक्यांची आतषबाजी झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कॅटी पेरी ही स्टेजवर तिच्या टीमसोबत परफॉर्म करताना दिसली.

रिपोर्टनुसार,कॅटी पेरीने तिच्या परफॉर्मन्ससाठी 5 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 45 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये बॅकस्टिच बॉईज या बँडनं देखील परफॉर्म केलं आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका यांचा लग्न सोहळा 12 जुलै रोजी बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com