Anant Radhika Pre Wedding: भव्य क्रूझ, 800 पाहुणे अन् शकीराचा परफॉर्मन्स; अनंत आणि राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग देखील आहे खास..

Anant Ambani And Radhika: अनंत आणि राधिका यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगच्या मेन्यूपासून ते प्री-वेडिंगला येणारे पाहुणे आणि परफॉर्म करणाऱ्या कलाकारांबद्दल सर्वकाही जाणून घेऊयात...
भव्य क्रूझ, 800 पाहुणे अन् शकीराचा परफॉर्मन्स; अनंत आणि राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग देखील आहे खास, जाणून घ्या सर्वकाही
Anant Ambani And Radhikasakal

Anant Ambani And Radhika Pre Wedding: अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika merchant) हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. अनंत आणि राधिका यांच्या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये लिहिण्यात आलं होतं की, अनंत अंबानी आणि राधिका यांचा लग्न सोहळा मुंबईत 12 जुलै रोजी बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. मार्च महिन्यात अनंत आणि राधिका यांचे पहिल्या प्री-वेडिंग फंक्शन पार पडले. अशातच सध्या एका आलिशान क्रूझमध्ये अनंत आणि राधिका यांचे दुसरे प्री-वेडिंग फंक्शन पार पडत आहे. अनंत आणि राधिका यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगच्या मेन्यूपासून ते प्री-वेडिंगला येणारे पाहुणे आणि परफॉर्म करणाऱ्या कलाकारांबद्दल सर्वकाही जाणून घेऊयात...

अनंत अंबानी आणि राधिका यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगबद्दलच्या खास गोष्टी-

  1. जवळपास 800 पाहुणे क्रूझ लाइनरवर अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंगसाठी आले आहेत. ही लक्झरी क्रूझ इटलीपासून फ्रान्सच्या दक्षिणेकडे जाणार आहे. क्रूझवर 29 मे रोजी वेलकम लंच पार पडले. या पार्टीच्या दुसऱ्या दिवशी क्रूझवर आलेले पाहुणे रोममध्ये गेले.

  2. क्रूझ तिसऱ्या दिवशी म्हणजे आज (31 मे) फ्रान्सला पोहोचे आणि आज तिथे पार्टीचे आयोजन केले जाईल.

  3. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये शकिरा परफॉर्म करणार आहे. शकिरा या परफॉर्मन्ससाठी जवळपास 10-15 कोटी मानधन घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.

  4. क्रूझमधील पार्टीच्या मेनूमध्ये पारशी, थाई डिशेसपासून ते मेक्सिकन आणि जपानी डिशपर्यंत विविध प्रकारच्या पदार्थांचा समावेश असणार आहे.

  5. आलिया भट्ट, रणबीर कपूर, रणवीर सिंग, सलमान खान, शाहरुख खान हे आपल्या कुटुंबियांसोबत अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी पोहोचले आहेत. आमिर खान, अनन्या पांडे, जान्हवी कपूर आणि इतर अनेकांनीही या पार्टीला हजेरी लावली.

क्रूझमधील व्हिडीओ व्हायरल

नुकताच सोशल मीडियावर अनंत आणि राधिका यांच्या क्रूझवरील पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही कलाकार स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com