Anant Ambani: संगीत सोहळ्यात सोन्याने मढले अनंत अंबानी; जॅकेटची किंमत पाहून धक्का बसेल?

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच काल त्यांचा ग्रँड संगीत सोहळा पार पडला.
Anant Ambani Wore Real Gold Swarovski Crystal jacket For Sangeet Ceremony
Anant Ambani Wore Real Gold Swarovski Crystal jacket For Sangeet Ceremony

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच काल त्यांचा ग्रँड संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्याला अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण खास चर्चा रंगली आहे ती म्हणजे अनंत अंबानींच्या जॅकेटची. त्यांच्या जॅकेटवरुन त्यांच्या श्रीमंतीचा थाट पाहायला मिळाला असल्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरु आहे.

अनंत अंबानी यांनी संगीत सोहळ्याचा खास शेरवानी परिधान केली होती. जे संपुर्ण सोन्यानी मढले होते. अनंत आणि राधिका यांनी त्यांच्या संगीत सोहळ्यासाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या आऊटफिटची निवड केली होती.

Anant Ambani Wore Real Gold Swarovski Crystal jacket For Sangeet Ceremony
Dhirubhai Ambani Story: धीरूभाई अंबानींनी माती विकून असे कमावले होते पैसे, IPO आधी 3 वेळा बदलले होते रिलायन्सचे नाव

निळ्या रंगाचे बांधगला जॅकेट म्हणजे ते शेरवानी सारखे दिसत होते. या जॅकेटवर खऱ्या सोन्याच्या तारेने फुलांच्या वेलीचे काम केले होते. इतकंच नाही तर या जॅकेटची बटणदेखील हिरे आणि माणिकांची होती. तर या जॅकेटची खरी किंमत अद्याप समोर आलेली नाही. पण हे सोन्यानी मढलेलं आणि हिऱ्याची जढण असलेल्या या जॅकेटची किंमत नक्कीच लाखोंमध्ये असणार.

Anant Ambani Wore Real Gold Swarovski Crystal jacket For Sangeet Ceremony
Mumabi Traffic Ambani Wedding : मुंबईत अंबानींचा हायप्रोफाईल लग्नसोहळा, वाहतुकीत महत्वाचे बदल; 'या' मार्गावर जाणं टाळा

तर राधिकाने या सोहळ्याला हिऱ्यांनी सजलेला लेहेंगा परिधान केला होता. यामध्ये आऊटफिटमध्ये ती खुपच सुंदर दिसत होती. अनंत अंबानीसारखचं राधिकाने परिधान केलेला लेहेंगाही तितकाच खास होता. तो लेहेंगा स्वारोवस्की क्रिस्टल्सने जडलेला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com