
घरी परत येणं प्रत्येकासाठी सुखद असतंच असं नाही आणि काही दरवाजे तर न उघडलेलेच बरे असतात. ZEE5 वर अंधार माया या पहिल्या मराठी हॉरर ओरिजनल सीरीजचा हादरवून टाकणारा थरारक ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हालाही असंच वाटेल. कोकणातल्या गूढ, काळोख्या, पछाडलेल्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या आवाजात लपून गेलेला, एकेकाळी अभिमानाचा विषय असलेला खातू कुटुंबाच्या पूर्वजांचा वाडा सगळ्यांना एका अंतिम विधीसाठी परत आणतो, मात्र या वाड्याच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. सगळ्यांची पुन्हा झालेली एक सुंदर भेट म्हणून सुरू झालेला हा प्रवास गडद होत जातो.